नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टी-20 नंतर वनडेचा कर्णधार बनलेला रोहित शर्मा (rohit sharma) मुंबईत प्रशिक्षणादरम्यान जखमी झाला आहे. भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. त्याआधी, सर्व खेळाडूंना मुंबईत तीन दिवसासाठी क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
टीम इंडिया 16 डिसेंबरला मुंबईहून रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉनच्या उद्रेकामुळे ही मालिका कठोर बायो-बबलमध्ये खेळली जाईल. खेळाडूंना मुंबईतील शिबिरात उपस्थित राहून बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी सर्व खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करतील, पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर खेळवला जाणार आहे.
IND vs SA 2021-22 – टेस्ट सीरीज शेड्यूल
पहिला कसोटी सामना, 26-30 डिसेंबर 2021, सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
दुसरा कसोटी सामना, ०३-०७ जानेवारी २०२२, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना, 11-15 जानेवारी 2022, सिक्स गन ग्रिल न्यूलँड्स, केप टाऊन
IND vs SA ODI 2022 – वनडे सीरीज शेड्यूल
पहिली एकदिवसीय – 19 जानेवारी 2022, युरोलक्स बोलँड पार्क, पार्ल
दुसरा एकदिवसीय सामना – 21 जानेवारी 2022, युरोलक्स बोलँड पार्क, पार्ल
तिसरा एकदिवसीय सामना – 23 जानेवारी 2022, सिक्स गन ग्रिल न्यूलँड्स, केप टाऊन
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (डब्ल्यूके), रिद्धिमान साहा (डब्ल्यूके), रविचंद्रन अश्विन, जयंत यादव. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या
- विराट कोहलीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बाबर आजमने बाळगले मौन
- शरद पवार पक्ष स्थापनेपासून पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहेत- देवेंद्र फडणवीस
- सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला सांगितला राऊतांनी उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ
- भाजप कार्यकर्त्यांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून; राऊतांविरोधात दिल्लीत तक्रार दाखल
- ‘…ही संकटाची चाहूल तर नाही ना , याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावेच लागेल’

