Share

विराट कोहलीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बाबर आजमने बाळगले मौन

Published On: 

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाने नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती, पण उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून संघाचा पराभव झाला होता, मात्र त्याआधी पाकिस्तानने पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा 10 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला.

विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघ कधीही हरला नव्हता, पण बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने हा पराक्रम करून दाखवला. सामन्यापूर्वी नाणेफेक सुरू असताना विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यात चर्चा झाली, तसेच सामन्यानंतर दोन्ही कर्णधारांमध्ये बराच संवाद झाला.

पाकिस्तान उद्यापासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत भाग घेणार आहे. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत यजमान संघाचा कर्णधार बाबर आझमने भाग घेतला. बाबर आझमला टी-20 मालिका आणि पाकिस्तानमध्ये परतणाऱ्या क्रिकेटबाबत बरेच प्रश्न विचारण्यात आले, मात्र यावेळी एका पत्रकाराने त्याला टी-20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारला, तुमच्यात काय संवाद झाला? आणि सध्या कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे, या वाईट काळात तुम्हाला काय म्हणायचे आहे?  या प्रश्नावर बाबर आझमने  मौन बाळगले आणि पीसीबीच्या माध्यम समन्वयकाने पत्रकाराला या मालिकेसाठी प्रश्न विचारण्यास सांगितले.

मात्र, पत्रकाराने पुन्हा आपला प्रश्न विचारला, ज्यावर बाबर आझम यांनी उत्तर दिले की, ‘बघा, आमच्यामध्ये जे काही झाले, ते मी सर्वांसमोर सांगणार नाही. या वक्तव्यानंतर बाबर आझम काहीच बोलला नाही आणि पुढच्या प्रश्नाकडे वळाला. बाबर आझमची वारंवार विराट कोहलीशी तुलना केली जाते आणि अलीकडेच विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते, ज्यावर बाबर आझमने उत्तर देणे टाळले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!