Share

‘विकासकामे केली असती तर महाजनादेश यात्रेची नौटंकी करण्याची गरज पडली नसती’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपची महाजनादेश यात्रा आणि शिवसेनच्या जनआशीर्वाद यात्रेला टक्कर देण्यासाठी पर्दाफाश यात्रा सुरु आहे. ही यात्रा भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आली असता कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नाना पटोले यांनी उपस्थितांना साम्बिधीत करताना फडणवीस सरकारने खरोखरच सिंचन, शेती, शहर विकास, दुष्काळ, बेरोजगारी निर्मुलन, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, विविध जातीसमुह यांच्या विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी काही टक्के जरी काम केले असते. तर भाजप सेना सरकारला राज्यात पंचतारांकीत सुविधा उपभोगत महाजनादेश यात्रेची नौटंकी करण्याची गरज भासली नसती असं विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना ‘जनता सरकारच्या कारभारावर प्रचंड नाराज आहे. हे या सरकारला पोलीस यंत्रणेकडून समजले आहे. त्यामुळेच हा अवाढव्य खर्च करून जनतेला भुलथापा देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अशा सरकारच्या भूलथापा व खोटारड्या सरकारला जनता बळी पडणार नाही व त्यांना त्यांची जागा दाखविणार असल्याचं विधान केले आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी जरी हे आरोप केले असले तरी भाजप आणि शिवसेनेकडून विकासकामांची पावती दिली जात आहे. तर राष्ट्रवादीही कॉंग्रेसप्रमाणे राज्य सरकारवर टीका करत आहे. परंतु निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अशी टीका कायमचं होत असते. त्यामुळे आता जनताचं कुणी कामे केली आणि कुणी नाही केली हे ठरवणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!