🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना काळात दवाखाना आणि आरोग्य व्यवस्था यांचे महत्व मोठ्या प्रमाणात समोर आले आहे. त्या अनुषंगाने राज्यात आता नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली. घाटी रूग्णालयातील समारंभात ते बोलत होते.
कोरोना काळात सगळ्यात जास्त ताण हा आरोग्य सेवेवर पडला. अशा संकटाना तोंड देत असताना आरोग्य सेवा कमी पडू नाही यासाठी डॉक्टर आणि नर्स यांची भरती जास्तीत जास्त करण्यात यावी. तसेच राज्याला वैद्यकीय महाविद्याल वाढवावी या हेतूने उस्मानाबाद, परभणी, सिंधुदुर्ग, रायगड याठिकाणी नवीन वैद्यकीय महाविद्यालय बांधणार असल्याची घोषणा केली.
वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाढवण्याचा सरकारचा मानस असून, त्यादृष्टी कोनातून सरकार पाउल उचलत आहे. तसेच अर्थसंकल्पात आरोग्य सेवेच्या दृष्टीकोनातून भरीव तरतूद करण्याची मागणी करणार असल्याचे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- बीडमध्ये काका-पुतण्यांच्या राजकारणामुळे जनता वेठीस-विनायक मेटे
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- हिरकणीनंतर आता सोनाली कुलकर्णी झळकणार आणखी एका शौर्यगाथेत
- ‘सतत टीका करणे योग्य नाही’, चेन्नईच्या पिचला नावं ठेवणाऱ्यांना गावसकरांचं चोख उत्तर
- कोणी काहीही बोलू द्या, मी संयमाने जनतेची कामे करतो-आ.संदिप क्षीरसागर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
