ठाणे : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर ताण आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेमध्ये परिचारिकांच्या पदासाठी भरती निघाली आहे.
ठाणे महानगरपालिकेतील नर्सच्या (जीएनएम आणि एएनएम) या पदांसाठी भरती होणार आहे. एकूण १८३० पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये पात्र उमेदवारांची निवड ही शॉर्ट लिस्टिंग,लेखी परीक्षा आणि मुलाखतींच्या आधारावर होणार आहे. या पदांसाठीची वेतनश्रेणी ही ३५ ते ४० हजार एवढी आहे. या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागेल. तसेच ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १४ जुलै २०२० पासून सुरू झाली असून शेवटची तारीख ही २८ जुलै २०२० आहे.
हे उमेदवार करू शकतील अर्ज : जीएनएम/बीएएसीची पदवी, नर्सिंगची पदवी, एएनएममधील पदवी आणि दोन ते तीन वर्षांच्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. भरतीसाठीची वयोमर्यादा ही नियमानुसार आहे.
येथे करा अर्ज : https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html वर नोंदणी करावी आणि https://est.tmconline.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. या भरतीसाठीची अधिक माहिती ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
घरच्या घरी ‘असा’ बनवा कोरोना काळात चर्चेत आलेला ‘मालेगाव काढा’
कोरोनाच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भूमिपूजनाचा घाट – थोरात
गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी दिलासा, एसटीने कोकणात जाण्यास सशर्त परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

