पुणे- देशात कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोरोनाचे रुग्णांची वाढत जाणारी संख्या आता कमी प्रमाणात झाली आहे. प्रशासन रुग्ण संख्या रोखण्यात यशस्वी झाले आहे. यावेळी महाराष्ट्रात प्रचंड चर्चा चालु आहे ‘मालेगाव पॅटर्न काढ्याची’.
साहित्य- १) पाणी १ लीटर, २) दालचिनी-२, ३) काळी मिरी-५, ४) लवंग-३, ५) इलायची-२, ६) तुळशीची पाने-४, ७) गवती चहाची पाने-४, ८) गुळ- चवीनुसार, ९) अद्रक- छोटा तुकडा, १०) हळद- एक चमचा.
कृती- सर्व वस्तू एकत्र बारीक करून पाण्यात टाकून उकळून घ्यावे. हे मिश्रण अर्धा तास उकळावे. सर्व घटकांमधील अर्क पाण्यात येउ द्यावा. हा काढा चाळणीने गाळुन घ्यावा. रोज सकाळी आणि रात्री अनोशापोटी हा काढा प्यावा.
हा काढा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या काढ्यातील सर्व पदार्थ आयुर्वेदिक आहेत. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोरोनाचा बचाव होऊ शकतो, तसेच यामुळे पित्ताचे त्रास, पचन, पोटाचे विकार, घशात दुखणे, खोकला या आजरांसाठी उपयुक्त आहे. या काढयामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झाली आहे असा दावा करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
केलेल्या पापांची फळे तर भोगावीच लागणार, या अभिनेत्याने केले सलमान खानला ट्रोल!
राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निधनानंतर शरद पवार थेट त्या कार्यकर्त्याच्या घरी…
रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे…भूमिपूजनाची तारीख ठरली,सुरु झाली जय्यत तयारी
छत्रपती संभाजीराजेंनी घेतले रायगड दर्शन; तब्बल १५० वर्षांनी भरलेल्या हत्ती तलावाचे केले जलपूजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

