मुंबई : देशासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट उभे आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूविरोधात देशाच्या सुरू असलेल्या लढाईत कोरोना योद्ध्यांची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांना दिवसेंदिवस कोरोनाचा ससंर्ग होत असल्याच दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात आणखी ७७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून, एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सामान्य नागरिकांबरोबर पोलीस विभागातही कोरोनाचे दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा उपाचार सुरू असलेल्या पोलिसांची एकूण संख्या १ हजार १५ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ६० पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
77 police personnel found positive for #COVID19 & 1 died in Maharashtra in the last 24 hours, taking the total number of active cases to 1,015 and death toll to 60 in the force: Maharashtra Police pic.twitter.com/ueab4qAHLj
— ANI (@ANI) July 1, 2020
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचली आहे. एकूण कोरोनाबाधितांमध्ये २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात १७ हजार ४०० जणांना जीव गमावावा लागलेला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्क्यांवर कायम
पत्रक जारी : गणेशोत्सव साजरा करताना ‘या’ सूचनांचे पालन करावे लागणार !
कोरोनामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचं निधन, राहुल गांधींना शोक अनावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

