Share

कोरोनामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचं निधन, राहुल गांधींना शोक अनावर

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : कोरोनाचे रुग्ण हे देशभरात आढळत आहेत. गेल्या २४ तासात देखील अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात जवळजव १३९६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा २७ हजारांच्या देखील पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात एकूण २७,८९२ रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी ८७२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे २३० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गुजरातमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ३०१ वर पोहचला आहे. तर गेल्या २४ तासांत १८ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १५१ वर पोहचला आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि अहमदाबाद महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या या नेत्याच्या जाण्याने गुजरात कॉंग्रेस शोकसागरात बुडाली आहे. एएनआय तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते शक्ति सिंह गोहिल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ज्या नेत्याचा मृत्यू झाला ते गुजरातमध्ये काँग्रेसच्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत शोक व्यक्त केलाय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यां आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बदरुद्दीन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, या दु:खी घटनेत मी त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या हितचिंतकांसमवेत आहे, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!