Share

पत्रक जारी : गणेशोत्सव साजरा करताना ‘या’ सूचनांचे पालन करावे लागणार !

Published On: 

मुंबई : कोरोनामुळे राज्यातील अनेक उत्सवांवर विरजण पडणार असल्याचं दिसत आहे. त्यापैकीचं एक म्हणजे गणेशोत्सव. राज्यात गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत असतो. मुंबई – पुण्यातील गणेशोत्सवाचा थाट हा काही औरचं असतो. मात्र यंदाचा गणेशोत्सव हा काहीसा रुखा सुका जाणार असल्याचं दिसत आहे.

याचं पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणेशोत्सव मंडळांना काही सूचना केल्या आहेत. त्याबाबत आता एक पत्रक देखील काढले आहे. त्यात त्यांनी सात नियम घातले आहेत. यामध्ये वर्गणी, श्रीमूर्ती, मंडप रोषणाई, आगमन, श्रीदर्शन, कार्यक्रम, विसर्जन, याबाबत काही सूचना केल्या आहेत.

मुंबईतील मोठ्या मंडळांनी ( आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये. मात्र केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये याकरिता या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करणे . श्रीमूर्ती : कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरावा . शक्य असल्यास शाडू मूर्तीस प्राधान्य द्यावे .

मंडप/रोषणाई : मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा . या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण , सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी. आगमन : श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क व सॅनिटीझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे .

श्रीदर्शन : मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस ( भटजी कार्यकते इ) हात – पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल अशी व्यवस्था करणे . कार्यक्रम : गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी यंदाच्या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबीर , रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे . विसर्जन : आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच श्रींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी.

दरम्यान यंदा गणेशोत्सव साजरा होणार असून तो साधेपणाने होणार आहे. सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आहे. हे संकट गणेशोत्सव पर्यंत कमी होईल अशी आशा सर्वांनाचं आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा होईल, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून सांगण्यात येत आहे.

याबबत समितेचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर म्हणाले की, सर्व गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याची तयार करा. पण गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात न करता अत्यंत साधेपणाने करा. कारण कोरोनानंतरही आपल्यापैकी प्रत्येकाला काळजी घेणं गरजेचं आहे.

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांचा तसंच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नाही. संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस तसंच पालिकेवर मोठा ताण आहे. यामुळे यावेळीही गणेश मंडळं आपली मदतीची परंपरा कायम ठेवणार आहेत, असेही नरेंद्र दहीबावकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनाची धोकादायक लक्षणे नसलेल्या व्यक्तीला आता दहाव्या दिवशीच घरी सोडणार

राज्यातील कोरोनाची सध्याची आकडेवारी, वाचा फक्त एका क्लिकवर !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!