Share

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्क्यांवर कायम

Published On: 

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज १९५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख ६६ हजार ७२३ नमुन्यांपैकी १ लाख ७४ हजार ७६१ नमुने पॉझिटिव्ह (१८.७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७८ हजार ३३ लोक होम क्वारंटाईन आहेत. सध्या ३८ हजार ८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५० मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४९ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ९५ मृत्यू हे मुंबई मनपा-३६, ठाणे-३, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा- ४, भिवंडी निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-२, नाशिक-२, नाशिक मनपा-१, जळगाव-५, पुणे-१, पुणे मनपा-५, पिंपरी चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-२, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-११, लातूर-१,अकोला-२, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

भारत देश लवकर करोनामुक्त होवो,पार्थ पवारांची तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना

शिक्षकांच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार – अजित पवार

खळबळजनक : सोनिया गांधींच्या निकटवर्तीय नेत्याच्या घरावर EDचा छापा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!