Share

छोट्या तैमुरनं आई करिनाकडून मागितलं हे बर्थडे गिफ्ट

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सैफ अली खान आणि करिना कपूरचा चिमुकला तैमूर हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. तैमूर या नावामुळे अनेक लोक या चिमुकल्याचा रागही करतात. क्वचितच एखाद्या स्टारकिडला इतकी लोकप्रियता आणि द्वेष एकत्र अनुभवायला मिळाली असेल.

तैमुर हा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे कायमच चर्चेत असतो. त्याचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. २० डिसेंबरला तैमुर तीन वर्षांचा होत आहे. तैमुरच्या दुसऱ्या वाढदिवशी करिनाचं कुटुंब परदेशात होतं. एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी हे कुटुंब परदेशात होतं. मात्र आता तैमुरचा वाढदिवस मुंबईत साजरा होणार आहे.

विशेष म्हणजे वाढदिवसासाठी तैमुरनं आईकडे खास गिफ्ट मागितलं आहे. तैमुरनं वाढदिवसासाठी भेट म्हणून आमच्याकडे दोन केक मागितले आहेत. त्याला एक सांताक्लॉजचा तर दुसरा हल्कचा केक हवाय, असं करिना टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाली.

त्याचे ८- १० मित्र मैत्रीण आणि संपूर्ण कुटुंब वाढदिवसाला येईल असं करिना म्हणाली. सध्या करिना तिच्या ‘गूड न्यूज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ती लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटातही दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206148991911546882?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206148103834718208?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206147843813040128?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!