मुंबई : मी फक्त एक वडापाव खाऊन दिवसभर मंत्रालयात लोकांच्या कामांसाठी फिरायचो. पण याच मंत्रालयात एक दिवस मंत्री म्हणून येईल, असं त्यावेळी वाटलं नव्हतं. त्यामुळे आजचा दिवस माझ्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे.असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा खात्याचा पदभार स्विकारला. “समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा हा विभाग आहे. मी वंचितांना लाभ मिळवण्याचा नेहमी प्रयत्न करेन.या विभागाची जबाबदारी देण्यास थोडा उशीर झाला आहे. मात्र मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेन,” असे धनंजय मुंडेंनी पदभार स्विकारल्यानंतर सांगितले.
जवाहरलाल नेहरु विद्यालय परिसरात झालेल्या हिंसाचाराचा मी तीव्र शब्दात निषेध करत असल्याचेही असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

