Share

अमिताभ बच्चन यांच्या “या” खास पोस्टवर नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंट्स

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनय, आवाज आणि कणखर व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. या वयातही त्याची उत्साही शैली चाहत्यांना प्रेरणा देते. अमिताभ यांनी नुकताच त्यांच्या ‘झुंड’ या चित्रपटातून पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. अमिताभ हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये लिहिले की, “इतरांसाठी खूप काम केले आहे. आता स्वत:साठी काहीतरी करणार आहे.”

त्यांच्या या पोस्टवर युजर्सनी मजेशीर कमेंट्स आणि मीम्स शेअर करायला सुरुवात केली. एकाने लिहिले कि, “हे आपण रोज म्हणतो सर.” तर दुसऱ्याने लिहिले, “अमित जी आराम करा.” काहींनी लिहले “ठीक आहे, तर मग काँग्रेस किंवा भाजप मध्ये सामील व्हा.” असेही लिहले. यातील एक मजेशीर कंमेंट अशी आहे, “बरोबर आहे, तुम्ही किती दिवस दुसऱ्या कंपनीचे १ रुपयाचे तेल विकत राहाल. आता स्वतःचे तेल काढण्याची वेळ आली आहे.”काहींनी राजकीय आणि धार्मिक कंमेंट देखील केल्या तर काहींनी त्यांना विविध सल्ले दिले आहेत. तसेच काश्मिरी पंडितांवरील ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाबद्दल बोलण्याचे आवाहन बऱ्याच जणांनी केले.

नुकताच अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लोक त्यांच्या अभिनयाचे आणि व्यक्तिरेखेचे ​​प्रचंड कौतुक करत आहेत. या चित्रपटात अमिताभ एका क्रीडा शिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट महाराष्ट्रातील विजय बारसे यांच्या जीवनावर बनवला आहे. त्यांनी नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये 36 वर्षे क्रीडा प्राध्यापक म्हणून काम केले. निवृत्तीनंतर मिळालेले 18 लाख रुपयांतून त्यांनी नागपूर जवळ जमीन खरेदी केली आणि झोपडपट्टीतील मुलांसाठी फुटबॉल अकादमी बांधली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!