Share

जगण्याच्या उमेदीवर नकारात्मकता घट्ट होत आहे, जगावेसे वाटत नाही! अशांसाठी मनोमित्र हेल्पलाईन बनली आधार

Published On: 

औरंगाबाद : ‘गेल्या दोन रात्री मी झोपलेलो नाही. माझ्यातल्या सकारात्मक विचारांवर नकारात्मक विचारांची पकड घट्ट होत आहे. मला आता जगावेसे वाटत नाही. कुणाशीतरी बोलावे म्हणून एक ऑप्शन म्हणून मी तुम्हांला कॉल केला आहे ‘. कोरोनामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झालेल्या कुटुंबाची जबाबदारी आलेल्या युवकाने मनपाच्या मनोमित्र हेल्पलाईनला एक शेवटचा कॉल केला. आणि आत्महत्येच्या वाटेवर अंतिम टोकावर पोहोचलेल्या या युवकाला मानसोपचारतज्ज्ञांनी अक्षरशः ओढून पुन्हा जीवनात आणले. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये निराशेचे वाढते प्रमाण पाहता मनपाद्वारे २६ मेपासून मनोमित्र समुपदेशन कक्ष सुरु करण्यात आला आहे.

कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये नैराश्य, भिती, अति विचार, तणावास सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर मनपाने शहरातील दोन संस्थांना सोबत घेऊन हेल्पलाईन सुरु केली आहे. ‘महाराष्ट्र  देशा’ने मनोविकारतज्ज्ञांकडून याबाबत जाणून घेतले. यावेळी मनोमित्र कक्ष समन्वयक कल्पना मोटे यांनी सांगितले, हेल्पलाईन नंबरवर फोन आल्यानंतर त्यांच्याशी बोलून ते कधी बोलू इच्छिता हे जाणून ज्यांची वेळ सुरु आहे त्या तज्ज्ञाकडे तो नंबर पाठवला जातो.

सध्या पंख फाऊंडेशन, सायकॉलॉजी असोसिएशन मिळून ३० मनोविकार तज्ज्ञांमध्ये दिवसभरात दोन दोन तास देण्यात आले आहेत. यातील डॉ. संदिप सिसोदे यांनी सांगितले, आत्तापर्यंत झालेल्या कॉल्समधून मृत्यूची भिती, चिंता, काळजी, पुन्हा लागण होण्याची भिती हि कारणे दिसून आली. सध्या दररोज ८ ते १० कॉल्स येतात. प्रत्येक येणाऱ्या कॉलचा दोन ते तीन दिवस पाठपुरावा केला जातो. बोलल्याने समस्या सुटु शकतात. त्यामुळे कॉल वर बोलणाऱ्याला आम्ही बोलते करतो, त्यांचे ऐकुन घेतो समजून घेतो. सकारात्मक विचार कसा करायचा यासाठी काही गोष्टी सांगतो.

कोविडमुळे वडिल गेले, आता मीही जीवन संपवतो

कोरोनामुळे वडिल गेले. एमसीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा तो कोलमडला. आई, आजीची जबाबदारी, लहान भावाचे शिक्षण कस करणार हा प्रश्न त्याला भेडसावू लागला. स्वत: साठी पाहिलेली स्वप्न धूसर झालेली त्याला दिसू लागली. त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
या मुलाने हेल्पलाईनवर कॉल केला. त्यानंतर तज्ज्ञांनी त्याच्याशी संवाद साधला. व त्याला सांगितले कागदावर तुझ्या समस्या लिही त्यावर तु काय करु शकतो हे पाहा. त्यानंतर पाच सहा दिवस त्याचे समुपदेशन झाले. आज त्याने बाहेरुन शिक्षण घेत नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तो खंबीर झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!