Share

‘अजितदादांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ‘ते’ पत्र चोरणे नैतिक की अनैतिक?’

Published On: 

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनाक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. त्यावेळी अजित पवार यांनी नाट्यमयरित्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती.

तसंच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात जात राष्ट्रवादीचे गटनेते असलेल्या अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. माझ्याकडे आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे, असं अजित पवारांनी तेव्हा आम्हाला सांगितल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. याच मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.

‘शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे,’ असा सवाल करत अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसंच जुनं झालं तरी खोट आहे ते खोटंच, असा टोलाही त्यांनी लगावला.

..तर आम्ही शरद पवारांच्या पाठीशी
‘संभाजीराजेंच्या घोषणेचं आम्ही स्वागत करत आहोत. मराठा आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करत असेल तर भाजप स्वत:चा झेंडा न घेता या आंदोलनात उतरेल हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण आणि तात्काळ सवलती मिळून देण्यासाठी जे जे लोक आंदोलन करतील त्यांच्या पाठी आम्ही उभे राहू. उद्या शरद पवारांनी आंदोलन केलं तर त्यांच्याही पाठी आम्ही उभे राहू. महाराज तर आमचे नेते आहेत. आमचे राजे आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!