🕒 1 min read
औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यासह जिल्ह्यातील शेतक-यांना खरिप हंगामातील पिक पेरणीचे वेध लागल्याने शेतक-यांची बी-बियाणे, खते, शेतीसाठी लागणाऱ्या औजारांची जुळवा जूळव करणे सुरू झाले आहेत. पावसाचे तालुक्यात समाधानकारक चित्र दिसून येत आहे.
मात्र, शेतक-यांनी बियाणे खरेदी करतांना खात्री करुनच बियाणे खरेदी करावी. जणेकरुन आपली फसवणूक टाळता येईल. मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेला अनुसरून खरिपाचे नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री भुसे यांनी राज्यातील कृषी विभागाला दिल्या आहेत. यासाठी पोक्राच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर तालुकानिहाय कृषी हवामान सल्ला सेवा सुरू करण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्रांच्या साहाय्याने ही सेवा देण्यात येणार आहे.
असे असतांनासुध्दा खरिपाच्या इतक्या मोठ्या सोहळ्यात बी-बियाणे, खते, किटक नाशक या माध्यमातून कोट्यावधीची उलाढाल होते. ही संधी साधून अनेकजण याचा आर्थिक फायदा घेण्यासाठी बाजारात बोगस बियाणे विक्री करणारे टपून असतात. कमी दरात बियाणे मिळत आहे म्हणून खरेदी न करता शेतक-यांनी खात्री करुनच बियाणांची खरेदी करावी. खरेदी केल्यानंतर संबधीताकडून पक्केबिल घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाकडून शेतक-यांना करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
