Share

जिंतूरमध्ये राष्ट्रवादीच्या विजय भांबळेंचा भाजपला शह, बोरी ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 14 जागांवर विजय

Published On: 

जिंतूर : येथील बोरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पॅनलने 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवून वर्चस्व कायम राखले आहे. बोरी ग्रामपंचायतीत माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली अजय चौधरी यांचे पॅनल विरुद्ध माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार सौ. मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. विद्या चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भाजप पॅनलमध्ये मोठी लढत झाली.

त्यात अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनलने मतमोजणीतून मोठी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे 17 पैकी 14 जागांवर या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. तर डॉ. विद्या चौधरी यांच्या पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.

दुसरीकडे, झरी ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या गजाननराव देशमुख व डॉ. प्रमोदराव देशमुख यांच्या जनसेवा पॅनलने 17 पैकी 10 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. या पॅनेलमधून सुनील देशमुख, गोदावरी अंभुरे, ज्योती हेडगे, अशोक चोरमले, रेवती जगाडे, दादाराव देशमुख, राहिना इनामदार, केशर मठपती, आसिफ कुरेशी, रेश्मा गवळी हे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार व दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य पॅनलने 7 जागा जिंकल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!