🕒 1 min read
मुंबई : सैफ अली खानची वेब सीरीज तांडव सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता या वेब सीरीजवर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी भाजप नेते राम कदम यांनी मुंबईत या वेब सीरीजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती आणि आता लखनऊमधील हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
लखनऊमध्ये हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा प्रकरणी या वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु कृष्णा मेहरा, लेखक गौरव सोलंकी यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याशिवाय माहिती व प्रसारण मंत्रालयही तांडव या वेब सीरिजच्या विरोधात आहे. मंत्रालयाने या वेब सीरीजसंदर्भात स्पष्टीकरण मागण्यासाठी अॅमेझॉन प्राइमला नोटीस दिली आहे.
बॉलिवूडमधील बहुचर्चित ‘तांडव’ वेबसिरिज नुकतीच प्रदर्शित झाली. परंतु ही वेबसिरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे, या वेबसिरिजला सध्या सोशल मिडियावर बरचं ट्रोल केले जात आहे. हिंदूंच्या देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप या वेब सीरिजवर ठेवण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार सिरीजमधील एका सीनमुळे घडला आहे.
या सीनमध्ये बॉलिवूड अभिनेता मोहम्मद जीशान अयूब स्टेडवर भगवान शंकरांची भूमिका करत आहेत. अशावेळी आणखी एक व्यक्ती स्टेजवर येते. त्यानंतरचं सगळं स्किट हे JNU शी जोडलं गेलं आहे. याचदरम्यान भगवान शंकरांची भूमिका करत असलेला अभिनेता जीशान अयूबने शिवी देतो. त्यामुळे या सिरिजवर चारही बाजूंनी टीकेची झोड उठवली जात आहे. या व्हिडिओवरून चाहत्यांनी आपला विरोध दर्शवला आहे. हिंदू संघटना देखील या व्हिडिओमुळे नाराज आहे.
महत्वाच्या बातम्या
- युपीत लव्ह जिहादचा तमाशा : नसिरुद्दीन शाह
- कोरोना महामारीमुळे मी पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही; फारुख अब्दुल्लांची व्यथा
- बॅटिंगदरम्यान ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मला डिवचत होते, शार्दूल ठाकूर म्हणाला…
- राज ठाकरे म्हणाले ताकदीने लढा, पण मनसेचे इंजिन सुरूच झालं नाही
- ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुरस्काराने महाराष्ट्र केसरी बालारफि शेखचा गौरव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
