मुंबई- जगभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा टाळेबंदी करण्यात आली आहे. यातच हज यात्रा 2021 साठीची ऑनलाईन अर्जप्रक्रिया कालपासून सुरु झाली. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मुंबईत याबाबत घोषणा केली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर, हज यात्रा 2021 साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. यात्रेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2020 असून हे अर्ज ऑनलाईन, ऑफलाईन किंवा हज मोबाईल ॲप वरून करता येणार आहेत, अशी माहिती नक्वी यांनी दिली.
हज यात्रा 2021 जून-जुलै महिन्यात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, या यात्रेसाठीची संपूर्ण प्रक्रिया सौदी अरेबिया सरकार आणि भारत सरकारने जारी केलेल्या आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुनच पूर्ण केली जात आहे आणि यापुढे देखील करू, असे नक्वी यांनी सांगितले.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ही यात्रा सुरु करण्यासाठीची ठिकाणे, आता दहापर्यंत कमी करण्यात आली आहेत.याआधी 21 ठिकाणांहून ही यात्रा सुरु करता येत असे. मात्र आता मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोचीन, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि श्रीनगर या ठिकाणांहून ही यात्रा सुरु करता येईल. मुंबई केंद्रावरुन महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, दमण आणि दीव तसेच दादरा नगरहवेली येथील यात्रेकरू बसू शकतील.
महत्वाच्या बातम्या
- डॉक्टरांची मेहनत आली फळाला, लढवय्या पँथरने दिला कोरोनाला धोबीपछाड
- लोकशाहीचं रक्षण करा आणि कधीही क्षुल्लक समजू नका! – अमृता फडणवीस
- माय फ्रेंड डोलांड ट्रंप आता वाचवायला येणार नाही – सचिन सावंत
- ‘गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल’
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे


