🕒 1 min read
बीड : अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, सर्वेक्षण होऊन तत्त्वतः मंजुरी मिळालेल्या सोलापूर-बीड-जळगाव रेल्वेमार्गास निधी उपलब्ध करून काम सुरू करावे, बेलापूर-गेवराई-परळी या स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रस्तावित रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करून त्यास मंजुरी द्यावी, या प्रमुख मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीरस अमरसिंह पंडित यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केल्या. या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले. याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते.
माजी आमदार पंडित यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना निवेदन देऊन बीड जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा केली. मराठवाड्याच्या भूमिपुत्राकडे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी आल्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून अनेक वर्षांपासून बीडमधील रखडलेले तिन्ही रेल्वे प्रकल्प आपल्या कारकीर्दीत पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हावासियांना असल्याची भावना माजी आमदार पंडित यांनी या वेळी व्यक्त केली. फेब्रुवारी १९९७ मध्ये मंजुरी मिळालेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याची आठवण या वेळी पंडित यांनी करून दिली. या कामासाठी राज्य शासनाचा हिस्सा शासन देत असून रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेऊन हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याची मागणी केली.
सोलापूर-तुळजापूर-बीड-जालना-जळगाव या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले असून त्यास मार्च २०१९ मध्ये रेल्वे मंत्रालयाने तत्त्वतः मान्यता दिलेली आहे. दक्षिण आणि उत्तर भारत जोडणाऱ्या या रेल्वेमार्गामुळे जालना येथील स्टील उद्योग, पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. त्यामुळे या रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी पंडितांनी केली.
व्यापारवृद्धीसाठी हाेईल फायदा
बेलापूर (श्रीरामपूर)-गेवराई-परळी या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण स्वातंत्र्यपूर्व काळात झालेले आहे. दोन मोठ्या जंक्शनला जोडणाऱ्या या रेल्वेमार्गामुळे ऊस आणि कापूस या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग जोडले जातील. पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासाबरोबरच व्यापार वृद्धीसाठीसुद्धा या रेल्वेमार्गाचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगून मराठवाडा विभागाचा पृष्ठभाग वाहतुकीच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी तिन्ही रेल्वेमार्ग महत्त्वाचे आहेत. ही कामे तत्काळ मंजूर करण्याची आग्रही मागणी पंडित यांनी केंद्रीय मंत्री दानवेंकडे केली.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

