मुंबई – कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तीन वर्षांपूर्वी केली होती. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा आपल्या मागणीची आठवण करून दिली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांना शिक्षणाकडे वळवले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या शिक्षणासाठी समर्पित केले म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी तीन वर्षापूर्वी केली होती.
कर्मवीर भाऊराव (अण्णा) पाटील यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी मागणी मी तीन वर्षांपूर्वी केली होती. यावर निर्णय घ्यावा, अशी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती. @NarendraModi https://t.co/2zb0gW1pUY
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 9, 2021
माझ्या दाढीत जितके केस आहेत तितके बहुजन शिक्षित करेन असा संकल्पच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अखंड ज्ञानदानाचा कार्यक्रम हाती घेतला. रयत शिक्षण संस्था नावाचा वटवृक्ष आजही तसाच उभा आहे आणि गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : आंदोलनाची भूमिका आश्चर्यकारक असून, हे केवळ राजकारण सुरू आहे – चव्हाण
- ‘योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान मोदी?’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- मराठा आरक्षणाच्या विषयावर कोणीही राजकारण न करता एकदिलाने काम करावे : शिंदे
- भाजपच्या आमदार आणि शिवसेनेच्या महिला नेत्यांची कोविड सेंटरवर धक्काबुक्की
- ऑक्सिजन निर्मितीबाबत नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिशाभूल सुरु आहे – गावीत


