🕒 1 min read
अहमदनगर : राज्यातील मुदत संपणार्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकार्यांना दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत असून पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंकेंनी केली आहे. त्यामुळे आता गावागावात ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याची दिलेले प्रलोभन योग्य नाही, अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास हा निधी आणणार कोठून, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आमदार लंके यांना टोला लगावला आहे.
यावर आता निलेश लंकेंनी प्रवीण दरेकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. प्रवीण दरेकर यांना ग्रामीण भागातील राजकारण माहिती नाही. त्यामुळे ते तसे बोलतात. निवडणुकांमध्ये झालेले तंटे दहा वर्षही मिटत नाहीत. असे तंटे होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो. निवडणुका टाळाव्यात, बिनविरोध सदस्य निवडले जावेत. सरपंचही बिनविरोध व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनीही अनेकदा व्यक्त केली. गावातील तंटे मिटावेत, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले. ग्रामीण भागाचा त्यांचा अभ्यास सखोल आहे. लहान प्रश्नही त्यांना माहिती आहेत. गावे आदर्श करताना ते हीच शिकवण गावांना देत असतात. प्रत्येक भाषणातून ते हे मार्गदर्शन करीत असतात. गावातील युवकांनी भांडणे टाळावेत. एकत्र येऊन ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात, असे ते कायम आवाहन करीत असतात. असे लंके म्हणाले आहेत
तर, मी घोषणा केल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. असे असताना दरेकर मात्र विरोधात बोलत आहेत. त्यामुळे दरेकर यांनी निधीची चिंता करू नये. चांगल्या कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला पुरेसा निधी देतील, असे आमदार लंके यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ऊर्जा विभागाच्या वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरित सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्या – नितीन राऊत
- काँग्रेस पक्षाच्या जवळ सर्व प्रकारची माणसे आहेत. मात्र युवकांची कमतरता – धिरज देशमुख
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात होणार देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ !
- पर्यटन विकासाला चालना देण्यासाठीच बीच शॅक धोरणाला मंजुरी – आदित्य ठाकरे
- विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत पूर्ण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

