मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमकेअर फंडाबाबत व्यवस्थित खुलासा करावा आणि सार्वजनिक उत्तरदायित्व आहे की नाही याच्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हाचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
हा फंड पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट २७ मार्च रोजी बनवण्यात आला. २८ मार्च रोजी कॉर्पोरेट मंत्रालयाने तातडीने या फंडला कंपनीचे सीएसआरचे फंड घेण्याची मान्यता दिली. प्रार्ईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड हा सीएसआरचे पैसै घेण्यासाठी क्वालीफाय असताना हा नवीन फंड का तयार करण्यात आला? असा सवाल करतानाच हा फंड का बनवण्यात आला याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलेले नाही असेही महेश तपासे यांनी सांगितले.
डिसेंबर २०१९ पर्यंत प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड यांच्याकडे ३ हजार ८०० कोटी बॅलन्स असतानादेखील पीएमकेअर फंड स्थापन करण्यात आला व त्याने पहिल्याच आठवड्यामध्ये ६ हजार ५०० कोटी रुपये जमा केले अशी घोषणा करण्यात आली असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर कंपनीमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचे वेतन घेण्यात आले. काही लोकांचा दावा आहे त्यांना माहितीही देण्यात आलेली नाही. मोठमोठ्या कंपनीतून, डिफेन्सकडून शेकडो कोटी रुपये घेण्यात आले. देशात ३८ पब्लिक सेक्टर अंडरटेकींग आहे. ज्यांचे २१०० कोटी या फंडामध्ये घेण्यात आले. कॉर्पोरेट डोनेशन घेत असताना त्याची वरची सीमा निश्चित करण्यात आली नव्हती. मात्र प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडमध्ये सीमा निश्चित करण्यात आलेली आहे.
पीएमकेअर फंडला मोदी सरकारने एक वेगळं स्थान दिले आहे त्यामुळेच हा फंड पब्लिक अकाऊंटब्लीटीअतंर्गत यावा आणि केंद्रसरकारने, वित्तमंत्र्याने या फंडासंदर्भात लोकांच्या मनात संशय आहे त्याबद्दलही खुलासा करावा अशी मागणीही महेश तपासे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात होणार देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ !
- पर्यटन विकासाला चालना देण्यासाठीच बीच शॅक धोरणाला मंजुरी – आदित्य ठाकरे
- विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत पूर्ण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
- डिसले गुरुजी यांच्या तब्येतीची डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून विचारपूस
- आरक्षण सोडत/ सरपंच व उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसाच्या आत होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

