मुंबई : सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. त्यानंतर आता पडळकरांनी संजय राऊतांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर यांनी राऊतांना एक पत्रच लिहिलं असून चांगलाच पाणउतारा यात केला आहे. या पत्रात तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? सडकून टीका पडळकर यांनी केली आहे.
या पत्रात गोपीचंद पडळकर म्हणतात की, मी आपणांस खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे उद्वोधन देऊन लिहू शकलो असतो, आपल्या दैनिकात माझा उल्लेख फेकूचंद केला यापद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही, प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे असं त्यांनी सांगितले.
फक्त टीका केली म्हणून एखाद्या नटीला जेरीस आणायचं अन् उखाड दिया म्हणत अशा भुरट्या मर्दागिनचं प्रदर्शन मांडायचं हे कसलं स्त्रीदाक्षिण्य? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही दाखले देत तुम्ही आपलं राजकारण करता त्यांचा आदर्श विसरलात का? संजय राऊत, आपला पगार किती आणि आपण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढे खासदार निवडून आलेत ते भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला? असा सवाल देखील यावेळी पडळकर यांनी विचारला आहे.
पडळकर पुढे म्हणतात, “संजय राऊतजी आपला पगार किती आणि आपण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले ते भाजपच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत, याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? उठसुठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे लायसन्स आपल्याला मातोश्रीवरुन मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या.”
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा…’, पडळकरांची राऊतांवर घणाघाती टीका
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमकेअर फंडाबाबत व्यवस्थित खुलासा करावा; राष्ट्रवादीची मागणी
- विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत पूर्ण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
- दरेकरांनी निधीची चिंता करू नये त्यासाठी आमचे अजितदादा खंबीर आहेत – निलेश लंके
- आरक्षण सोडत/ सरपंच व उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसाच्या आत होणार


