औरंगाबाद : शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर नामकरण करण्यासाठी राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याची माहिती देताना सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता.
अशातच, औरंगाबादमध्ये ‘सुपर संभाजीनगर’ असा फलक शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्याशी संबंधित एनजीओने हा फलक लावला आहे. या फलकामुळे चर्चांना नामकरणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. तर, याआधी खासदार देखील शिवसेनेचेचं होते. तर, राज्याचे मुख्यमंत्रीपद देखील शिवसेनेकडे आहे.
त्यामुळे, नामकरणाचं राजकारण सोडून हिंमत असेल तर सत्ताधाऱ्यांनी संभाजीनगर नामकरणाचा अध्यादेश काढावा असं खुलं आव्हान मनसेतर्फे देण्यात आलं आहे. मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे म्हणाले, ‘संभाजीनगर व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनापासून इच्छा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील संभाजीनगर नामकरण झालं पाहिजे असं आवाहन सरकारला केलं आहे.
‘ज्या पद्धतीने शहरात प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्यावतीने हे नाटक केलं जात आहे. लव्ह औरंगाबाद असा फलक फोडण्यात आला. ते अतिशय निंदनीय व चुकीचं आहे. शहरातील वातावरण सत्ताधाऱ्यांनी चांगलं ठेवावं ते बिघडवू नये. फक्त सुपर संभाजीनगर असे फलक लावून काही होणार नाही. तुमच्यात जर हिंमत असेल तर संभाजीनगर नामकरणाचा अध्यादेश काढून दाखवा’ असं खुलं आव्हानच त्यांनी शिवसेनेला दिलं आहे.
‘संभाजीनगर करण्याची ताकद ही बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. ती आता शिवसेनेत राहिलेली नाही कारण ते काँग्रेस आणिराष्ट्रवादीच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. फलक तोडून काय साध्य करायचं आहे? वातावरण दूषित करू नका’ असा इशाराच मनसेतर्फे सुहास दाशरथे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत;केंद्रीय कृषिमंत्र्यांचा पुनरुच्चार
- आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय : पवार
- कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही : मुख्यमंत्री
- महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा, पक्ष सर्व मदत करेल : अस्लम शेख
- काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजपा नेते प्रवेश करणार : बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

