🕒 1 min read
Ashish Shelar | मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोचक टोला लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये एक विनयभंगाचा गुन्हा देखील आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्यामुळे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. यावर आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे.
निर्दोषत्व सिद्ध करु शकत नसल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचे वेडे चाळे सुरू असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. “चोरी पकडली गेली म्हणून पोलिसांना दोष दिला जात असल्याची टीका शेलारांनी केली. आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय सबंध आहे. ‘हे म्हणजे चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंडचं स्टेशन आलं का, असं विचारण्यासारखे आहे.’ जर जितेंद्र आव्हाड निर्दोष आहेत तर त्यांनी कायदेशीर बाजू लढावी. प्रत्येक निर्दोष व्यक्तीला आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा असते. निर्दोषत्व सिद्ध करता येत नसेल तेव्हा असे वेडे चाळे सूचतात”, अशी टीका शेलार यांनी केली.
राजीनामा द्यायचा असेल तर द्या-
आमदारकीचा राजीनामा आणि या प्रकरणाचा काही सबंध नाही आणि राजीनामा द्यायचा असेल तर द्या, ती जागा आम्ही जिंकून येऊ, असा दावा देखील आशिष शेलार यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. यावर आशिष शेलार यांनी पलटवार केला. सामान्य महाराष्ट्रातल्या मराठी कुटुंबाला, आरोप प्रत्यारोप, विनयभंग, दादागिरी करू नये. असं केल्यास त्यावर कायदेशीर बडगा आहे. हे गृहमंत्र्यांनी दाखवलंय. म्हणून त्यांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतोय, असे शेलार म्हणाले.
माझी चोरी पकडली गेली. तर पकडणारा पोलीस जबाबदार, असं तालिबानी मानसाला शोभणारं वक्तव्य जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे, असा टोला देखील शेलार यांनी लगावला आहे.
आव्हाड प्रकरणावर भाजप आमदार आतुल भातखळकर म्हणाले, “एका महीलेच्या दंडाला हात लावून ढकलण्यात आले हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतेय. तरीही कांगावा लोकशाही बुडाल्याचा होतोय. अशाप्रकारे गैरवर्तन झाल्यानंतर ती महीला गप्प बसली असती तर लोकशाहीची मान उंचावली असती का?”
महत्वाच्या बातम्या :
- Virat Kohli | विराट कोहलीची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल, नक्की काय आहे ‘त्या’ व्हिडिओमध्ये?
- Jitendra Awhad | मोठी बातमी! आव्हाडांवर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
- Ajit Pawar | “विनयभंगाचे कलम लावणे अतिशय भ्याड, सरकारने गुन्हा मागे घ्यावा” ; अजित पवार यांनी मागणी
- Chandrashekhar Bawankule | “जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करा”, चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांकडे मागणी
- Ajit Pawar | “आव्हाडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी” ; अजित पवार आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

