🕒 1 min read
मुंबई: बेळगावात पुन्हा एकदा भाजपने कमळ फुलवित पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला . यावरूनच मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, अशा शब्दात बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. तर यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.
‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, अशा शब्दात बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र बेळगावात मराठी माणूस हरला नसून शिवसेना हरली आहे. भाजपचे किमान १५ मराठी उमेदवार जिंकले आहेत. ही फशिवसेना असल्याचे मराठी माणसाच्या लक्षात आले आहे.’ असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, अशा शब्दात बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
बेळगावात मराठी माणूस हरला नसून शिवसेना हरली आहे. भाजपचे किमान १५ मराठी उमेदवार जिंकले आहेत. ही फशिवसेना असल्याचे मराठी माणसाच्या लक्षात आले आहे. pic.twitter.com/L7c0W61w5B— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 6, 2021
दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एवढ्या वर्षांपासून तिथे प्रशासक नेमला होता. पण अचानक तिथे निवडणूक घेण्यात आली. प्रचाराला वेळ मिळू दिला नाही. हे सर्व प्रकरण पाहिल्यावर हा पराभव घडला हे दुर्दैव असलं, तरी कर्नाटकचं सरकार सीमाबांधवांचा आवाज कोणत्या पद्धतीने दडपतंय हे पाहिलं की अंगावर काटा उभा राहतो. तरीही आमचे लोक तिथे संघर्ष करतात, लाठ्या खातायत,तुरुंगात जाताय. त्याचं कौतुक करायला हवं. तर तुम्ही पेढे वाटताय? असा खोचक टोला राऊत यांनी लगावला होता. यावरच भाजपचे अतुल भातखळकर यांनी प्रतिउत्तर देत राऊत यांना सुनावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे – मलिक
- देशाला अग्रेसर करण्यासाठी सर्वांना सोबत प्रयत्न करावे लागतील – सरसंघचालक
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- ‘मोहन भागवत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले..’
- ईडीने हस्तक्षेप करणं एका अर्थानं राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणं; शरद पवारांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
