टीम महाराष्ट्र देशा: सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ असणारे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडताच सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्यासाठी हालचाली होत आहेत.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात याबद्दलची रणनीती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्ष[पदाची संधी मिळू शकते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या दिवशीच आमदार मकरंद पाटील यांची जिल्हा बँकेत रिक्त संचालकपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष उपस्थित नसताना संचालक मंडळाने ही निवड करून योग्य तो संदेश दिला होता. शुक्रवारी शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या बैठकीत नवीन अध्यक्षपदावर चर्चा झाली. यामध्ये विक्रमसिंह पाटणकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह अन्य एका नावाची चर्चा बैठकीत झाली.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्र लुटणाऱ्या तसेच कारखाने मोडून खाणाऱ्यांची चौकशी करणार : पाटील
हकालपट्टी झाली तर काय झालं… आता रणांगणातून माघार नाही.. विधानसभा लढवणारच’
राजकारण आणि सिनेमातील ‘खिलाडी’ एकमेकांना भेटतात तेव्हा …
इंदापूरच्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील माझ्याकडे तिकीट मागत आहेत : महादेव जानकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

