टीम महाराष्ट्र देशा: पुणे जिल्हा शिवसेनेतील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेडपी सदस्य आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात काम केल्याचा ठपका बुचके यांच्यावर ठेवण्यात आला आहे, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख (शिरूर लोकसभा) राम गावडे यांनाही पदावरून दूर करण्यात आले आहे.
दरम्यान,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. हकालपट्टी झाली तर काय झालं… आता रणांगणातून माघार नाही.. विधानसभा लढवणारच, अशी आक्रमक भूमिका बुचके यांनी घेतली आहे.लोकसभा निवडणुकीत पक्षाचे मी प्रामाणिपणे काम केलं. मात्र तरीदेखील कारवाई झाल्याने मला मानसिक धक्का बसला आहे. असं असलं तरी मला सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा असल्याने मी निवडणुकीसाठी सज्ज आहे, असंही बुचके म्हणाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईची बडगा शिवसेनेकडून उगारण्यात आला आहे, पुणे शहरातील दोन्ही शहर प्रमुखांना पदावरून हटवण्यात आले आहे, आता बुचके आणि गावडे यांना देखील पक्षातून काढण्यात आलं आहे. आशा बुचके या २००२ पासून जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांनी आणि २०१४ मध्ये पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

