अहमदाबाद : राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे. अशातच गुजरातमधून राज्याच्या राजकारणाला हलवून टाकणारी एक बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याची माहिती आहे. अहमदाबादच्या फार्महाऊसवर ही भेट झाली. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यावेळी अहमदाबादेतच होते. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नाही.
दुसरीकडे, शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. शांतिग्राममधील गेस्टहाऊसला पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. अँटिलिया प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते असलेले ‘गृहमंत्री’ अनिल देशमुख अडकल्याने राष्ट्रीय पातळीवरही दबाव वाढत आहे. या पार्श्वभूनीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे. याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर होण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे’ ?
- पत्नीच्या अनैतिक संबंधांला कंटाळून पतीने घेतला गळफास
- तिसऱ्या वन डे सामन्यातून कुलदीप यादव जाऊ शकतो बाहेर ; अशी असू शकते प्लेइंग XI
- ‘नियमांचे उल्लंघन केल्यास सबंधित चित्रपटगृह, मॉल, हॉटेल हे कोरोनाची साथ असे पर्यंत कायमचे बंद’
- धोनीच्या अनुपस्थितीमुळे कुलदीप-चहलची जोडी फ्लॉप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

