Share

शरद पवारांच्या विश्वासू माजी आमदाराचं कोरोनाने निधन ! पवारांसह फडणवीसांनी व्यक्त केला शोक

Published On: 

वाशिम : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. तर, बड्या नेत्यांसह अनेक कलाकारांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांचे विश्वासू माजी आमदार प्रकाश डहाके यांचं कोरोनाने निधन झालं आहे.

यामुळे राष्ट्रवादी पक्ष शोकसागरात बुडाला असून अनेक नेत्यांनी डहाके यांच्या निधनानंतर दुःख  व्यक्त केलं आहे. डहाके यांनी कारंजा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. नागपूरच्या शूअरटेक रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते मृत्यू ६७ वर्षांचे होते.

काही दिवसांआधी त्यांना आणि त्यांच्या पत्नी व एका मुलाला करोनाची लागण झाली होती. यावेळी त्यांची प्रकृती खालावली. यावेळी उपचारासाठी त्यांना अमरावती इथं दाखल करण्यात आलं. या ठिकाणी उपचार दरम्यान प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना नागपूर इथल्या शूअरटेक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर येत आहे.

विविध नेत्यांनी व्यक्त केला शोक –

‘वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाशदादा डहाके यांच्या निधनानं ग्रामीण जनतेशी नाळ जुळलेलं, शेतकरी, कष्टकरी बांधवांची दु:ख दूर करण्यासाठी तळमळीनं कार्य करणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!’ असं ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

‘माजी आमदार प्रकाशराव डहाके यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुबीयांना मिळो, अशी प्रार्थना करतो! ॐ शांति,’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यासह इतर पक्षातील नेत्यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!