🕒 1 min read
परभणी : राज्यातील पहिले कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेले कोव्हीड केअर सेंटर देणाऱ्या परभणी जिल्ह्याने आणखी एक किमया केली आहे. अवघ्या सात दिवसात सर्व सुविधांसह १०० बेडचे कोव्हीड केअर सेंटर उभारण्याचा मानही परभणी जिल्ह्याने पटकावला आहे. सेलू इथल्या बाजार समितीने हे सेंटर उभारले आहे.
मानवत इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकतेच कोव्हीड केअर सेंटर सुरू केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे राज्यातील पहिलेच केंद्र आहे. त्यात आता केवळ ७ दिवसात सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने १०० बेडचे सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे उद्घाटन परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुगळीकर यांच्या हस्ते झाले.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटर उभारण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीने अवघ्या ७ दिवसात १०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारले आहे.(१/३)#Parbhani#Selu#Maharashtra pic.twitter.com/MWedQ0AnWp
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 10, 2021
या सेंटरच्या उद्घाटनाला पालकमंत्री नवाब मलिक यांनी ऑनलाईन हजेरी लावली. पालकमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतूक केले असून प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक मदत करण्याचा सूचना देखील दिल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना आवाहन करण्यात आल्या नंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाबद्दल वाईट बोलणाऱ्या कॉंग्रेस कमिटीच्या दादा मुंडेला दिला चोप!
- महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार ! ‘या’ १७ शहरांमध्ये पूर्ण लॉकडाऊन
- ‘नागरिक मरतानाही लस निर्यात करणे गंभीर कृत्य’
- ग्रामीण महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार ; मोदींनी पाठवली मोठी मदत
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
