टीम महाराष्ट्र देशा – देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत यांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते.
या दौऱ्यानिमित्त ते निफाड येथे आले होते. यावेळी त्यांनी परतीच्या पावसाने यंदा कांद्याला मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा ५०-६० रुपये किलो दराने खावा लागला, तर खुशाल खाल्ला पाहिजे. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही असं संतप्त विधान त्यांनी केले आहे.
त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एकेकाळी कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करणारे सदाभाऊ खोत आज मात्र, ‘कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही’ असे म्हणतात. सत्तेची मस्ती यालाच म्हणायचे का ? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
एकेकाळी कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करणारे सदाभाऊ खोत आज मात्र,
'कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही'
असे म्हणतात.सत्तेची मस्ती यालाच म्हणायचे का ? https://t.co/ygC03Abq2o
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 2, 2019
दरम्यान, राज्यात पडणाऱ्या या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक कडधान्यांची पिके वाया गेली आहेत. त्यात सोयाबीन, मुग, द्राक्षे, कांदा या पिकांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190560451911831552?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190560223007657985?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190556256567619584?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

