Share

वाशिम जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

Published On: 

वाशीम – राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय.सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान,वाशिम जिल्हा परिषदेच्या एकूण 14 जागांसाठी निवडणूक झाली होती आणि या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक म्हणजेच 5 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 जागा, काँग्रेसच्या दोन जागा आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 8 जागा मविआकडे आहेत. 14 जागांपैकी 8 जागांवर मविआने विजय मिळवल्याने वाशिम जिल्हा परिषदेवर सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!