मुंबई : एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला त्यांनी धक्के देण्यास सुरुवात केली होती. शेकडो कार्यकर्त्यांनी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची वाट धरली होती.
त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला उतरती कळा लागल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आणखी काही भाजप नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचं सूचक विधान केलं होतं. आता, भाजपाला सोडचिठ्ठी देणारे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार जयसिंगराव गायकवाड हे आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
जयसिंगराव गायकवाड हे उद्या (मंगळवारी) मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या जयसिंगराव गायवाड यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्ली होती. त्यांनी भजपच्या प्रदेश कार्यसमिती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव नाराज होते. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू होती. गायकवाड सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते.
आता होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी मराठवाडा विभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, त्यासोबतच भाजपाला रामरामही ठोकला. त्यामुळे, राष्ट्रवादी भाजपला एकापाठोपाठ एक धक्के देताना दिसत असून राजकीय क्षेत्रातील हालचाली वाढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मराठी भाषेबद्दल वादग्रस्त वक्त्यव्य करणारा, जान कुमार सानू ‘बिग बॉस’च्या घरातून बेघर
- वीजबिल माफ न केल्यास सरकारला पळता भूई करून सोडू – कर्णबाळा दुनबळे
- ‘आधी पाकिस्ताननं बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीला आपण नंतर जाऊ’
- राज्यात पुन्हा लॉकडाऊन ? विजय वडेट्टीवार यांचे संकेत…
- पुणे : हिंजवडी वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
