Share

T20 World Cup : १५ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच भारताचं लक्ष्य; ‘असे’ आहेत भारताचे सामने

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टी-२० विश्वचषकाचे अंतिम २ संघही निश्चित झाले आहेत. झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात विश्वचषकात आपले स्थान पक्के केले आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. टी-२० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहेत. टीम इंडियाही यावेळी विजेतेपद पटकावण्याचा उद्देशाने स्पर्धेत उतरेल. २००७ मध्ये भारताने शेवटचे टी-२० विश्वचषक जिंकले होते. तेव्हापासून आतापर्यंत भारताला विजेतेपद पटकावण्यात अपयश आले आहे. म्हणजेच १५ वर्षांपासून भारत विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. रोहित शर्माचा कर्णधार म्हणून भारतासाठी चांगली कामगिरी आहे. अशा स्थितीत भारतीय संघाचे लक्ष गेल्या पंधरा वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे असणार आहे.

सुपर-१२ मध्ये २ गट

सुपर-१२ मध्ये २ गत करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना गट १ मध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय २ संघांना या गटात पात्रता फेरीतूनही स्थान मिळेल. गट-अ मधील विजेता आणि गट-ब मधील उपविजेता संघाला येथे खेळायचे आहे. तर बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांना गट २ मध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय फेरी-१ मधील गट-ब मधील विजेता आणि गट-अ मधील उपविजेत्या संघालाही स्थान देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजचीही येथे खेळण्याची शक्यता जास्त आहे. यानंतर दोन्ही गटातील टॉप २ संघ उपांत्य फेरीत जातील. उपांत्य फेरीचे सामने ९ आणि १० नोव्हेंबरला होणार आहेत. त्यानंतर फायनल १३ नोव्हेंबरला होणार आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे.

टीम इंडियाचे टी-२० विश्वचषकातील सामने

२३ ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान
२७ ऑक्टोबर विरुद्ध ग्रुप ए उपविजेता
३० ऑक्टोबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२ नोव्हेंबर विरुद्ध बांगलादेश
६ नोव्हेंबर विरुद्ध ग्रुप बी विजेता

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!