Share

पुणे दौऱ्यावरून शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका ;म्हणाले कि

Published On: 

पुणे : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे रविवार ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पुणे दौऱ्यात मोदी शहरातील विविध कामांचं अनावरण करणार आहेत. यात पुणे महानगरपालिका भवनाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच पुणे मेट्रोचे पण उदघाटन करण्यात येणार आहे.

येत्या काहीच दिवसात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. भारतीय जनता पक्षाने याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या प्रधानमंत्र्यांना पाचारण केलं असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

“२०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाने पुणे महानगरपालिकेची सत्ता पहिल्यांदा काबीज केली. परंतु गेल्या ५ वर्षात भाजपला कोणतेच भरीव काम करता आले नाहीये म्हणूनच आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला देशाच्या प्रधानमंत्र्यांना पाचारण करावे लागत आहे” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!