Share

पेट्रोलची टाकी ताबडतोब भरून घ्या, मोदी सरकारची ‘इलेक्शन’ ऑफर संपणार आहे: राहुल गांधी

Published On: 

नवी दिल्ली : 10 दिवसांत पेट्रोल – डिझेल 12 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. 3 मार्च रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 117.39 डॉलरवर गेली आहे. निवडणुकांनंतर किंमती झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. सध्या भाव स्थिर असले तरी येत्या 10 दिवसांत दर 12 रुपयांनी किमती वाढण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर निशाणा साधून लोकांना त्यांच्या पेट्रोलच्या टाक्या भरण्याचे आवाहन दिले आहे. कारण “इलेक्शन ऑफर” लवकरच संपणार आहे म्हणत ट्विटरवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

५ राज्यातील निवडणुकीच्या प्रचार शनिवारी संपणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी लोकांना ताबडतोब टाक्या फुल भरायला सांगितल्या आहेत. मोदी सरकारची “इलेक्शन” ऑफर संपणार आहे असा टोला मारला. मागच्या अनेक दिवसापासून भाजप सरकार निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ थाबवते. निवडुका संपल्या की परत दर वाढवले जातात. उत्तर प्रदेशातील ५ राज्यातील निवडणुका ज्या १० फेब्रुवारीला सुरु झाल्या होत्या त्या ७ मार्च ला संपणार आहेत. त्याआधी पेट्रोलची टाकी ताबडतोब भरून घ्या असा खोचक टोला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!