Share

‘झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्यामागे राष्ट्रवादी, शिवसेनेची सेटिंग’ ; भाजपचा आरोप

Published On: 

मुंबई : एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती. या समितीच्या अहवालावरून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून मागवला असता अहवाल गायब झाल्याचं उत्तर अजित पवारांना मिळालं होतं.

यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. मात्र, हा अहवाल काल संध्याकाळी सापडला देखील. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्यामागे राष्ट्रवादी, सेनेचा हात असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

झोटिंग समितीचा अहवाल गहाळ होण्यामागे एकमेव कारण म्हणजे खडसेंना क्लीनचिट नाही आहे. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की यामध्ये घोटाळा झाला आहे. त्यामुळे ईडीची चौकशी शेवटच्या टप्प्यापर्यंत आल्यानंतर झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्याचं षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने रचलं होतं. हा अहवाल लवकरात लवकर खुला करुन जनतेसमोर मांडावा, भाजपची मागणी आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले.

दरम्यान झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. दिवसभर उलटसुलट चर्चा झाल्यानंतर अखेर हा अहवाल सापडला आहे. या अहवालात खडसेंवर ताशेरे ओढण्यात आल्याचे समजते आहे. हा अहवाल उघड करण्यात आलेला नाही. मात्र यामुळे खडसे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!