परभणी : मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीने बुधवारी पालम तालुक्यातील प्रमुख गळाटी व लेंडीसह सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नद्यांना पूर आला आहे. परिणामी, १२ गावांचा संपर्क पालम शहराशी तुटला आहे. गंगाखेड-लोहा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पहाटेपासून ठप्प झाली आहे. गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असलेली गळाटी व लेंडी नदीला आज पहाटेपासून पूर आला आहे. दोन्ही नद्यांचे पाणी नदीपात्र सोडून जवळपास दोन हेक्टर क्षेत्रावरून वाहत असल्याचे दिसत आहे.
परभणी जिल्ह्यात सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे पाऊस झाला. मंगळवारी (दि.१३) जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परभणी तालुक्यात २१.६ मिमी, गंगाखेड २५.९ मिमी, पाथरी १५.९ मिमी, जिंतूर १९ मिमी, पूर्णा २५ मिमी, पालम १०.७ मिमी, सेलू २१.३ मिमी, सोनपेठ २९.३ मिमी, मानवत तालुक्यात ८.४ मिमी पाऊस झाला.
पावसाच्या पाण्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आल्याने गंगाखेड-परभणी महामार्गावरील नागठाणा पाटी येथून सुनेगाव, सायळा मार्गे मुळी, नागठाणा, धारखेड तसेच परभणी तालुक्यातील धसाडी, अंगलगावकडे जाणाऱ्या मार्गावर सुनेगाव जवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने सोमवारपासून बंद असलेली वाहतूक बुधवारी देखील बंद पडली. सलग तिसऱ्या दिवशी हा मार्ग बंद झाला आहे.
सुनेगाव, सायळा, मुळी, नागठाणा, धारखेड, धसाडी, अंगलगाव या सात गावांचा संपर्क पुन्हा तुटला आहे. तर महातपुरी फाटा ते भांबरवाडी दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या नाल्यावर चार ठिकाणी नव्याने उभारलेल्या पुलाची उंची कमी आहे. यामुळे चार पैकी दोन पुलावरून पाणी वाहत असल्याने भांबरवाडीकडे जाणारा रस्ता बंद पडला असून गावांचा संपर्क तुटला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या परभणी जिल्ह्यात दमदार आगमन केले. पावसाचा जोर येथे कायम आहे. शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. यावेळी रस्ते, नाले वाहत होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्रास प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ..अन् आव्हाड म्हणाले, ‘माझी एकुलती एक मुलगी राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’
- मोदी सरकारची घोषणा! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ
- शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट; केशव उपाध्ये यांची टीका
- ‘उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा’
- आर्यलँडच्या विजयानंतर टीम इंडियाला बसला फटका, मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

