Share

मुंबईतील एनसीबी अधिकाऱ्याकडून रेल्वेमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

Published On: 

🕒 1 min read

बीड : मुंबई अंमली पदार्थ नियंत्रण विभागातील अधीक्षक पदावरील अधिकाऱ्याने रेल्वेमध्ये विद्यार्थिनीची छेड काढली. या प्रकरणात परळी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दिनेश चव्हाण असे अधिकाऱ्याचे नाव असून परळी रेल्वे पोलिसांनी अटक करून त्यांना औरंगाबाद येथील न्यायालयात हजर केले.

मिळालेल्या माहितीनूसार, मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभागात काम करणारे दिनेश चव्हाण हे हैदराबाद-हडपसर रेल्वेने गुरुवारी रात्री उदगीर ते लातूर रोडदरम्यान प्रवास करत होते. लातूर रोड रेल्वेस्थानकादरम्यान त्याने २५ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. परळी रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केली. विनयभंगाचा गुन्हा दाखल करून औरंगाबाद येथे रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले.

मुंबई अंमली पदार्थ नियंत्रण विभागात दिनेश अंकुश चव्हाण हा सुप्रिटेंडंट म्हणून काम पाहतो. तो मुंबई झोनल युनिटमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली. हा अधिकारी एनसीबीच्या मुंबई विभागामध्ये काम करत होता. पण प्रकृती अस्वास्थामुळे तो कोणताही खटला हाताळत नव्हता. तो नवी मुंबईत राहतो आणि दोन आठवड्यांपासून प्रकृती अस्वास्थामुळे रजेवर होता. अधिकारी हैदराबादमध्ये एका खटल्याच्या कामासंदर्भात गेले होता.

रेल्वेमध्ये २० वर्षीय विद्यार्थिनी झोपलेली असताना अधिकाऱ्याने तिचा विनयभंग केला. अचानक झालेल्या या घटनेने महिला घाबरली आणि तिने आरडाओरडा केला. त्यामुळे सहप्रवासी त्याठिकाणी आले. प्रवाशांनी अधिकाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडितेची तक्रार रेल्वेमध्ये टीसींनी नोंदवून घेतली. यानंतर अधिकाऱ्यावर भारतीय दंड संहिता कलम 354 (A) (लैंगिक छळ) आणि 509 (महिलेचा अपमान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘या अधिकाऱ्यावर मानसिक उपचार सुरू होते आणि तो आठ महिन्यांपासून रजेवर होता. त्याचे प्रकृती अस्वास्थ लक्षात घेता त्याला सेवेतून निवृत्त करण्यासाठी त्याच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया विभागाकडून सुरू आहे’. ड्रग्ज प्रकरणाच्या कारवाईत त्याचा कोणताही सहभाग नव्हता, असे एनसीबी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!