मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपतूच्या आत्महत्यानंतर त्याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती वर संशय घेण्यात आला होता. त्यानंतर ती वादाच्या रिया भोवऱ्यात सापडली. या प्रकरणी रियावर सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर सुशांतच्या आत्महत्याची चौकशी करत असताना ड्रग्स प्रकरणात रियाला एनसीबीने ताब्यात घेतलं. सुशांतला अंमली पदार्थांचं व्यसन लावून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप तिच्यावर आहे. या प्रकरणी सुरु असलेल्या चौकशीत तिनं धक्कादायक खुलासे केले आहेत. आता आणखी एक मोठा खुलासा तिने केला असून यामुळे याची चर्चा होत आहे.
रियाने चौकशी दरम्यान साराचं नाव पुढे केलं आहे. साराने रियाला गांजा ऑफर केला होता. असा दावा तिने केला आहे. ‘सारा अली खान हातानं रोल करून गांजाची सिगारेट तयार करत असे. ती माझ्यासोबत ही सिगारेट शेअर करत असे. ६ जून २०१७ मध्ये सारानं तिच्या घरी मला वोडका आणि गांजा ऑफर केला होता. शिवाय या अंमली पदार्थांची नशा चढल्यावर त्यातून बाहेर कसं पडायचं याचा उपाय देखील सांगितला होता. हे सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे काही वॉट्सअप मेसेज देखील आहेत.’ असा दावा रियानं एनसीबीला दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सारा आणि सुशांतनं केदारनाथ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. त्यानंतर ते दोघंही एकत्र व्हेकेशनसाठी गेल्याचंही बोललं गेलं होतं. सुशांतच्या आत्महत्येला लवकरच एक वर्ष पूर्ण होतं असून, याबाबत अजूनही काय ठोस पुरावे समोर आले नाही. १४ जूनला सुशांत सिह राजपूतने वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्व ओबीसी संघटनांना एकत्र घेऊन आंदोलने करणार’
- ‘हातात कागद न घेता ठाकरेंना मराठा आरक्षणाबाबत एकही मुद्दा सांगता येणार नाही’
- मोदी सरकार म्हणजे हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे सरकार – रामदास आठवले
- विषय हार्ड : निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये चक्क ‘शुभमंगल सावधान!’
- आम्ही अडचणीत, आम्हाला मदत करा; छगन भुजबळांचा फडणवीसांना फोन आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

