Share

आधी गाण्याचे तर आता नाचाचे कार्यक्रम पहायला बोलवून बनवलं जात आहे नक्षलवादी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- नक्षलवादाची चळवळ कमजोर पडत चालल्याचं बघून बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी गरगरीब आदिवासींना फसवून नक्षलवादी बनवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. नक्षलवादी वेगवेगळ्या गाण्याच्या कार्यक्रमातून तरुणांची माथी भडकवतात हे वारंवार समोर आलं आहे. मात्र आता नाचाचे कार्यक्रम बघायला आदिवासी मोठ्या संख्येने गर्दी करत असतात, ही गोष्ट हेरून नक्षलवाद्यांनी नाचाच्या कार्यक्रमांचे आयोजन करायला सुरूवात केली आहे.

नाच हा आदिवासी जीवनशैलीतील महत्वाचा भाग आहे. या नाचाचे कार्यक्रम पहायला आलेल्या आदिवासांची माथी भडकावण्याचे कारस्थान सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. माथी भडकावून या आदिवासींना नक्षलवादी मोहिमेत सहभागी करून पुन्हा आपल्या चळवळीला बळकटी मिळेल अशी आशा या नक्षलवाद्यांना वाटत आहे.

ओडिशातील मलकानगिरी, रायगडा, कालाहांडी, मयागडच्या जंगलात नक्षलवाद्यांनी भरती केंद्र उघडली आहेत. इथे ते तरुणांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबून बघत आहेत. नाचाच्या कार्यक्रमांचे आयोजन हा त्यातलाच एक मार्ग आहे. सुरक्षा दलांनी राबवलेल्या ऑपरेशन प्रहारमुळे नक्षल चळवळीचं कंबरडं मोडलं असून मोठ्या प्रमाणावर मारले जाणारे सहकारी बघून अनेकांनी आत्मसमर्पणाचा मार्गही स्वीकारला आहे. यामुळे ही चळवळ आत्तापर्यंत कधीही झाली नव्हती इतकी कमजोर झाली आहे.

नुकतेच गडचिरोलीच्या सी -60 जवानांनी मोठे ऑपरेशन पार पाडलं. ४८ तासात तब्बल ४० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या कारवाईमुळे नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!