Share

टायगर श्रॉफच्या ‘हीरोपंती २’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकाची भूमिका साकारणार

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेता टायगर श्रॉफने कमी कालावधीतच त्याच्या अंदाजमध्ये अनेकांच्या मनात जागा निर्माण केली. टायगर तरुण वर्गामध्ये लोकप्रिय असल्याचे दिसून येते. टायगर श्रॉफने ‘हीरोपंती’ या चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. ‘हीरोपंती’ लोकांच्या पसंतीस पडल्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘हीरोपंती २’ येणार आहे. या चित्रपटाबद्दल आणखी एक विशेष माहिती समोर आली आहे. या चित्रपटात आता नवाजुद्दीन सिद्दीकी देखील दिसणार असल्याचे समजत आहे. ‘हीरोपंती २’ या चित्रपटात नवाजुद्दीन खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

‘हीरोपंती २’ या चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण यावर्षी होणार होतं. मात्र, कोरोना व्हायरसचे संकट असल्यामुळे खबरदारी म्हणून लॉक डाउन लागू करण्यात आले आणि या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली नाही. चित्रपटाचा काही भाग हा आधीच शूट झाला आहे. कोरोना परिस्थिती थोडी निवळल्यानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.

https://www.instagram.com/p/CG6r8X9BGq3/?utm_source=ig_web_copy_link

‘हीरोपंती’ या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेननने मुख्य भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री तारा सुतारिया ‘हीरोपंती २’ मध्ये दिसणार आहे. टायगरने या वर्षी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याचे सांगितले. ‘हीरोपंती २’ हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या आधी हा चित्रपट १६ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता.

‘हीरोपंती २’ चित्रपटापूर्वी टायगर आणि नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. अहमद खान ‘हीरोपंती २’ चे दिग्दर्शन करणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत याआधी टायगरचा ‘बागी ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘हीरोपंती २’ नंतर टायगर ‘बागी ४’ आणि  ‘रैंबो’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका पाहण्यासाठी त्यांचा चाहता वर्ग या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!