Share

अभिनेता विद्यूत जामवालचं नाव जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टमध्ये सामील

Published On: 

मुंबई : अभिनेता विद्यूत जामवालचं  नाव स्टंटबाजबाज ओळखल जात. त्याने अनेक चित्रपटामध्ये आपले स्टंट दाखवले असून तो कमी कालावधीतच अनेकांच्या पसंतीस उतरला. अभिनेता विद्यूत जामवाल हा नेहमीच त्याच्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांना अॅक्शन ट्रीट देत असतो. जगातील टॉपचे अॅक्शन हिरो आहेत त्यांना आव्हान देणारा हा अभिनेता आहे. अशा या स्टंटबाज अभिनेता विद्यूत जामवालचं नाव आता जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टमध्ये सामील झालं आहे. सोशल मीडियाद्वारे विद्यूतने ही माहिती दिली असून अनेकांनी त्याचे कौतुक केल आहे.

नुकतीच इंटरनेटवर जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टची यादी जाहीर झाली. यापुर्वी या यादीत की चॅन, ब्रुस ली, जॉनी ट्राय गुयेन, स्टीवन सीगल, डोनी येन, टोनी जा यांची नाव पुढे होत. आता या यादीत अभिनेता विद्यूत जामवालचं सुद्धा सामील झालंय. ही बातमी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत एक स्क्रीनशॉट जोडून ‘जय हिंद, कलारीपयट्टू’ असं लिहिलं आहे.

https://www.instagram.com/p/CPZ6llMHV_x/?utm_source=ig_web_copy_link

जगातल्या टॉप मार्शल आर्टिस्टच्या यादीत त्याचं नाव आलंय. त्यामुळे विद्यूतचं नाव गुगलवर सर्च केल्यानंतर त्याच्या नावाच्या बाजुला जगातील सर्वोत्तम मार्शल आर्टिस्ट असं लिहिलेलं दिसेल. त्याने शेअर केलेल्या स्क्रीनशॉट मध्ये देखील ते दिसून येत आहे. ही गोष्ट त्यासाठी अभिमानाची असून भारतीयांसाठी देखील अभिमानास्पद बाब आहे.

विद्युत शेवटच्यावेळी फारूक कबीरच्या खुदा हाफिज या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अन्नू कपूर, शिवलिका ओबेरॉय, अहाना कुमरा, शिवा पंडित यांनीही काम केले होते. त्यानंतर आता कनिष्क वर्मा दिग्दर्शित क्रेझ चित्रपटात विद्युत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!