मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे.
आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं सध्या भारतीय क्रिकेटपटूंना ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. रिषभ पंत देखील जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. टीम इंडिया सध्या मुंबईमध्ये आपला कॉरंटाइन कालावधी पूर्ण करत आहे. दोन जूनला संघ इंग्लंडला रवाना होणार आहे.
गेल्या काही महिन्यात रिषभ पंत भारतीय संघात एक मॅच विनर खेळाडू म्हणून समोर आला आहे. पंतने गेल्या काही महिन्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिनही प्रकारात सातत्याने चांगली कामगीरी केली आहे. यादरम्यान पंतने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपीटल्सच्या संघाचे नेतृत्व केले. दिल्ली संघाचे यशस्वीपणे नेतृत्व करत पंतने त्याचे नेतृत्व गुणाची ओळख क्रिकेट जगताला करुन दिली आहे.
सध्या ऋषभ पंतची सर्वच स्तरातून वाह-वाह होत होती. दरम्यान इंग्लंडचा टी-20 स्पेशलिस्ट टाइमल मिल्सने पंतमुळे कसोटी क्रिकेट पाहावसं वाटतं अशी कबुली दिली. मिल्स म्हणाला, ‘मला मूळात कसोटी क्रिकेट जास्त आवडत नाही, पण जेव्हापासून ऋषभ पंतला खेळताना पाहिलं, तेव्हापासून मी त्याच्या बॅटिंगचा फॅन झालोय आणि त्यामुळे मला कसोटी सामनेही आवडू लागले आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी… प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या
- जालन्यातील 5 पोलिसांचं निलंबन, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय?; चित्रा वाघ संतापल्या
- लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली
- जालन्यातील धक्कादायक घटना; फेसबुक लाइव्ह करत तरुणाची आत्महत्या!
- शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित


