बीड: जिल्ह्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर किरण दुकाने सकाळच्या वेळेत उघडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी लागु केलेला लॉकडाऊन शहरातील मोठ्या व्यावसायिकांना मान्य नाही. शहरातील दुकाने समोरुन जरी बंद दिसत असले तरी पाठीमागील बाजूने सर्रास सुरू आहेत. सामाजिक आंतर व मास्क ना लावता ग्राहक दुकानदार वावरतात. यामुळेच शहर व तालुक्यात रूग्णांच्या आकड्यात वाढ होत आहे.
वडवणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील मोठे व्यावसायिक समोरून दूकान बंद ठेवुन एखादा नोकर दारात ठेवतात आणि ग्राहक आले त्यांना मात्र पाठीमागे असलेल्या दरवाजातून सर्रास सामान देतात. वडवणी पोलीसांना हा सर्व प्रकार माहीत आहे. लहान व्यावसायिक लॉकडाऊन कधीतरी उठेल व व्यवसाय पुन्हा सुरू होईल. या आशेने दुकानात सामान भरण्यासाठी दुकान उघडतात व पुन्हा बंद करतात. यावेळात मात्र थोडेही शटर वर झालेले दिसले की व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
गरीब व लहान दुकानदार गुन्हा दाखल करण्याच्या भितीने नगदी दंड भरतात.याउलट शहरातील मोठ्या व्यावसायिकांना पोलीसांनी रान मोकळे सोडले आहे.शटर उघडे नसले कोणीतरी दुकानासमोर ऊभा करायचे ग्राहक आला की त्याला पाठीमागच्या दरवाज्यातुन सामान द्यायचे किंवा ग्राहकाला दुकानात घेऊन बाहेरून दुकानाला कुलुप लावायचे व सामानाची खरेदी झाली की लगेच दूकान उघडुन ग्राहकाला बाहेर सोडायचे.हा सगळा प्रकार वडवणी पोलीसांना माहीती आहे.मात्र वडवणी पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी… प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या
- जालन्यातील 5 पोलिसांचं निलंबन, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय?; चित्रा वाघ संतापल्या
- लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली
- जालन्यातील धक्कादायक घटना; फेसबुक लाइव्ह करत तरुणाची आत्महत्या!
- शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित

