बीड: गेवराई तालुक्यातील जव्हारवाडी येथील एका ३२ वर्षीय महिलेवर एका माणसाने अत्याचार केले असल्याची घटना समोर आली आहे. शौचास गेलेल्या महिलेला मागून येऊन आरोपीने मारहाण केली व त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. तसेच पोलिसांना सांगितला तर मारून टाकेल अशा धमक्या देत आरोपी तिथून पळून गेला. ही घटना १३ मे रोजी घडली मात्र २७ मे रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. २८ तारखेला आरोपीला अटक करण्यात आली.
गेवराई तालुक्यातील जव्हारवाडी येथील एक ३२ वर्षीय महिला १३ मे रोजी संध्याकाळी घरापासून जवळपास असलेल्या ठिकाणी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शौचास गेली असता आरोपी संतराम नवनाथ जवरे (वय ३५ वर्षे रा.जव्हारवाडी) हा पाठीमागून येऊन सदरील महिलेस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन गावापासून दोन कि.मी.अंतरावर घेऊन जात रात्री तिच्यावर अत्याचार केला.
दुसऱ्या दिवशी १४ मे रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिला गावात आणून सोडले. दरम्यान पोलिसांना तक्रार दिल्यास तुझ्या पतीला जीवे मारून टाकील अशी धमकी दिली. या प्रकरणी २७ गुरुवारी महिलेच्या तक्रारी वरून गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी संतराम नवनाथ जवरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला शुक्रवारी दुपारी गावातून ताब्यात घेण्यात आले असून या घटनेचा तपास फौजदार संदिप काळे करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी… प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या
- जालन्यातील 5 पोलिसांचं निलंबन, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांना का वाचवलं जातंय?; चित्रा वाघ संतापल्या
- लॉकडाऊन नंतर पर्यटकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी MTDC आणि कर्मचाऱ्यांनी कंबर कसली
- सोलापूर : अहिल्यादेवींचा 15 फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय
- शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

