Share

‘नवाब मलिक यांनी वेळीच तोंड बंद कराव, नाही तर कळेल अशा भाषेत उत्तर देऊ’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादादरम्यान मोदींना भावना अनावर झाल्या. कोरोनाने झालेल्या मृत्यूंमुळे मोदी भावूक झाले असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कोरोनाशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटला असल्याचे यावेळी दिसले.

यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केलेली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बोलताना मोदीसाहेब नेहमी परचा आणि मास्क वापरत होते. मात्र त्याचदिवशी परचा आणि मास्क दोन्ही गायब होते, याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.’ असे विधान करून त्यांनी मोदींवर टीकास्त्र डागलेले आहे.

नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपवर व केंद्र सरकारवर टीकास्त्र डागताना पाहायला मिळत आहे. यामुळेच आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मलिकांवर धमकी वजा इशाराच दिला आहे. ‘ड्रग्जच्या आरोपाखाली अटक झालेल्या जावयाची सुटका होत नसल्यामुळे नवाब मलिक यांचं डोकं फिरलय, त्या फ्रस्ट्रेशनमधून त्यांची बेताल बडबड सुरू आहे. त्यांनी तोंड वेळीच बंद कराव, नाही तर कळेल अशा भाषेत उत्तर देऊ.’ असा इशाराच अतुल भातखळकर यांनी मालिकांना दिला आहे.

दरम्यान, देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये सतत चालू असलेल्या राजकारणाला आता जनता कंटाळलेली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!