Share

‘…म्हणून नवाब मलिकांना टार्गेट केलं’ – पृथ्वीराज चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांची तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. तर दुसरीकडे मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नवाब मलिक यांना झालेली अटक राजकीय सुडातून झाली आहे, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. तसेच ३० वर्षे जुने प्रकरणं काढलं आहे. ही फक्त राजकीय आकसातून केलेली कारवाई आहे. नवाब मलिक भाजपवर टीका करते होते म्हणून त्यांना टार्गेट केलं आहे, असंही चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!